Pune News : छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी बिडी आता ‘साबळे बिडी’

एमपीसी न्यूज – छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी बिडी आता ‘साबळे बिडी’ या नावाने विकली जाणार आहे. कंपनीचे जाहिरात व प्रसिद्धी प्रमुख राहुल साबळे यांनी ‘एमपीसी न्यूज’ला याबाबत माहिती दिली.

संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमी संघटनांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी संभाजी बिडीला तीव्र विरोध करत नाव बदलण्यासाठी आंदोलन केली होती. वाढता विरोध लक्षात घेता कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. नाव बदलण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला थोडा वेळ लागणार असल्याचे कंपनीने म्हटले होते. त्यानुसार येत्या काही दिवसांत संभाजी बिडी ‘साबळे बिडी’ या नावाने विकली जाणार आहे.

आगामी काही दिवसांत याबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेऊन नव्या नावाची घोषणा केली जाणार आहे. येत्या काळात साबळे बिडी या नव्या नावाने बिडीची विक्री होईल असे राहुल साबळे म्हणाले.

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष सतीश काळे म्हणाले, वेळोवेळी केलेला पाठपुरावा आणि आंदोलन यामुळे ब्रिगेडच्या मागणीला यश आले आहे. शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करुन कंपनीने घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी कंपनीचे आभार मानले आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.