Pune News : मध्य रेल्वेने कमावला आतापर्यंतचा सर्वाधिक ‘भंगार महसूल’

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्ष 2022-23(एप्रिल ते डिसेंबर) दरम्यान भंगार विक्रीतून रु. 349.99 कोटी (Pune News)  मिळवले आहेत.मध्य रेल्वेचा भंगार विक्रीतून मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक  महसूल आहे.

 

Pune News : सुवर्णतुला’, ‘सौभद्र’मधील नाट्यपदे ऐकण्याची रविवारी संधी

 

मध्य रेल्वेने सर्व स्थानके, विभाग, प्रतिष्ठाने, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व रेल्वे स्थाने/विभाग भंगारमुक्त करण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” सुरू ठेवले आहे.एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने (Pune News) केलेली ही सर्वाधिक भंगार विक्री आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच कालावधीत साध्य केलेल्या रु. 333.98 कोटींच्या तुलनेत हा भंगार महसूल 4.79% अधिक आहे.

भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच नाही तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत झाली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.