Pune : हडपसर ते पुणे स्थानकादरम्यान तिसरी मार्गिका टाकण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रस्ताव

एमपीसी न्यूज – हडपसर ते पुणे स्थानकादरम्यान तिसरी मार्गिका ( Pune) टाकण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात हडपसर स्थानकावरून रेल्वे सुरू करण्यासाठी ही मार्गिका फायदेशीर ठरणार आहे.

पुणे स्थानकावर शंटिंगसाठी अथवा घोरपडीतील पीटलाइनवर गाडी घेऊन जाण्यासाठी सोलापूर किंवा मिरज मार्गिकेचा वापर होतो. शंटिंगवेळी या दोन्ही मार्गिका ब्लॉक होतात. त्यामुळे दौंड किंवा मिरजहून पुणे स्थानकावर दाखल होणाऱ्या प्रवासी गाड्यांना होम सिग्नलवर शंटिंग पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते.

Pune : चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा – सुप्रिया सुळे

प्रवाशांचा हा वेळ वाचावा म्हणून रेल्वे प्रशासनाने हडपसर ते पुणे स्थानका दरम्यान तिसरी मार्गिका टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. या तिसऱ्या मार्गिकेला घोरपडीतील कोचिंग डेपोला जोडण्यासाठीचाही प्रस्ताव आहे.

असे झाल्यास घोरपडी, पुणे स्थानकावर रेल्वे आणण्यासाठी मिरज व सोलापूरच्या मार्गिकेचा वापर करावा लागणार नाही. तसेच भविष्यात हडपसर स्थानकावरून रेल्वे सुरू करण्यासाठीही तिसरी मार्गिका फायदेशीर ठरणार आहे.

पुणे स्थानकावर दररोज रेल्वे गाड्यांचे व इंजिनचे शंटिंग होते. एका शंटिंगसाठी सुमारे 15मिनिटांचा वेळ लागतो. याचा परिणाम प्रवासी गाड्यांच्या वेळेवर होतो. शंटिंग सुरू असल्याने व फलाट उपलब्ध नसल्याने दररोज किमान 50 गाड्यांना होम सिग्नलवर 10 ते 15 मिनिटे थांबून राहावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो.

हे लक्षात घेऊन रेल्वेच्या परिचालन विभागाने हडपसर ते पुणेदरम्यान तिसऱ्या मार्गिकेचा व कोचिंग डेपो तिसऱ्या मार्गिकेला जोडण्याचा प्रस्ताव विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांच्याकडे दिला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास प्रवाशांची सोय ( Pune) होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.