Talegaon Dabhade : दोन चोरट्यांनी अवघ्या 30 सेकंदात मंदिरातून चोरली दानपेटी

एमपीसी न्यूज : पुण्यातील तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील दुर्गामाता मंदिरातून दोन अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली. चोरट्यांनी काही अंतरावर जाऊन दानपेटी फोडून रक्कम चोरून नेली.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी पहाटे घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे दुर्गामाता मंदिर असून पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरात आणि आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री त्यांनी केली. अवघ्या 30 सेकंदात त्यांनी मंदिरातील दानपेटी काही अंतरावर फोडली आणि पैसे घेऊन पळ काढला.

Lonavala : मित्रांसोबत वाढदिवस साजरा करायला गेलेल्या तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत (Talegaon Dabhade) कैद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दानपेटीत किती रक्कम होती हे अद्याप कळू शकलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.