Pune News : वकिलांच्या खर्चाबाबतच्या ठरावाचा फेरविचार करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकिलांचा खर्च पुणे महापालिकेने करण्यास गेल्या आठवड्यात स्थायी समितीने मंजुरी दिली होती. परंतु, या नियमबाह्य मंजुरीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असून त्याचा फेरविचार करून दफ्तरी दाखल करावा, असा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सादर केला आहे. 

केवळ स्वत:च्या फायद्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सत्ताधारी भाजपकडून सातत्याने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच भाजपने राज्य सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर बाजू मांडण्यासाठी वकिलांचा खर्च महापालिकेने करण्यास स्थायी समितीत मंजुरी दिली आहे. परंतु, सर्वसामान्यांच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करणाऱ्या भाजपच्या या कृतीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळेच त्याचा फेरविचार करून दफ्तरी दाखल करावा, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी दाखल केला आहे.

तसेच, हा ठराव विखंडित करावा, अशी मागणी येत्या मंगळवारी मंत्रालयात नगरविकास खात्याकडे करणार आहोत, आशी महिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.