Pune News : पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मोडल हबच्या मान्यतेसाठी पर्यावरण विभागाची भेट

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकमध्ये स्वारगेट हे अत्यंत महत्वाचे स्थानक आहे. स्वारगेट स्थानकामध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळाचे आणि पीएमपीएमल चे मोठे बस स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांना जोडण्यासाठी मेट्रोने स्वारगेट येथे मल्टी मोडल हब उभारण्याचे योजिले आहे, जेणेकरून एसटी बसचे प्रवासी, पीएमपीएमएलचा वापर करणारे प्रवासी, रिक्षा, कार, रेडिओ टॅक्सी आदी वाहनांचा एकत्रित विचार करून तसेच त्यांचे सुचर आवागमन होण्यासाठी मल्टी मोडल हबचे नियोजन केले आहे.

 

मल्टी मोडल हबसाठी आणि तेथे बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक बांधकामासाठी पर्यावरण विभागाची मान्यता अपरिहार्य आहे. पर्यावरण मान्यतेसाठी महामेट्रोने केंद्र शासनाच्या environment clearance committee ला योग्य त्या कागदपत्रांसहित अर्ज केला होता.

त्या अनुषंगाने आज environment clearance committee चे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर, सदस्य मुकुंद पाठक, सदस्य शल किरण आचरेकर, सदस्या डॉ. असीम हरवंश यांनी स्वारगेट मल्टी मोडल हबच्या कामाचे निरीक्षण केले. महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती सांगितली. त्याचबरोबर महामेट्रो पर्यावरण संवर्धनासाठी ज्या उपाय योजना करत आहे त्याची माहिती सांगितली.

समितीचे अध्यक्ष डॉ. म्हैसेकर यांची महत्वाच्या सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कार्यकारणीच्या इतर सदस्यांनीदेखील महत्वाचे मार्गदर्शन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.