Ind Vs Eng Test : केएल राहुलच्या शतकी पारीच्या जीवावर पहिल्या डावात भारत सर्वबाद 364

एमपीसी न्यूज – भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारताकडून सलामीवीर केएल राहुलने केलेल्या शतकी पारीच्या (129) जीवावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 364 धावापर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक पाच बळी घेतले.

दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजी हवी तशी झाली नाही. केएल राहुल बाद झाल्यानंतर एका मागोमाग एक खेळाडू बाद झाले. भारताचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. अजिंक्य रहाणे केवळ 1 धाव करून तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत 37 धावा करत बाद झाला. तर मोहम्मद शमी खातंही खोलू शकला नाही. रवींद्र जडेज्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला कुणाचीही म्हणावी, अशी साथ मिळाली नाही. जडेजाने 120 चेंडूत 40 धावा केल्या.

इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक पाच बळी घेतले. रॉबिन्सन आणि वुड यांनी प्रत्येकी दोन तर, मोईन अलीने 1 बळी घेतले. सॅम करणला एकही बळी मिळाला नाही.

दरम्यान, सध्या इंग्लंडचे रॉरी बर्न्स (2) आणि डॉमिनिक सिब्ले (4) धावांवर मैदानात खेळत आहेत. 5.2 षटकात संघाच्या 10 धावा झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.