Pune News : फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि जंगली महाराज रस्ता आज 6 ते 12 बंद!

एमपीसी न्यूज : नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी तरुणाई अबालवृद्ध फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर जल्लोष करते. परंतु, यंदा 31 डिसेंबरला दोन्ही रस्त्यांवर सायंकाळी 6 ते 11 रस्ता वाहतूक रहदारीसाठी पूर्णत: ठेवण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. शहर आणि उपनगरातून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो तरुण-तरुणी दोन्ही रस्त्यांवर प्रचंड आनंदात, उत्सवी वातावरणात जल्लोष करत असतात.

विद्युत रोषणाई, फटाके, आतषबाजी देखील केली. परंतु, यंदाच्या वर्षी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत रात्रीची संचारबंदी आदेश लागू आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी विचारात घेऊन दोन्ही रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.

त्यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. प्रत्येकाने आपआपल्या घरातच राहून नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.