Pune News : गुंड निलेश घायवळला ‘या’ गुन्ह्यात जामीन मंजूर

एमपीसी न्यूज : पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळला (Pune News) मोक्काच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चॉपरचा धाक दाखवून टोळी सदस्यामार्फत जबरदस्तीने जीप कार बळकावल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी घायवळवर मोक्का कारवाई केली होती. याप्रकरणात तो उच्च न्यायालयात गेला होता. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत एका व्यवसायिकाने तक्रार दिली होती.

भाऊच्या रॅलीसाठी गाडी पाहिजे, असे म्हणून चॉपरचा धाक दाखवून रॅलीसाठी जीप घेऊन गेल्यावरून नीलेश घायवळ व ८ सदस्यांवर खंडणीविरोधी पथकाने दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. निलेश घायवळ, संतोष धुमाळ, कुणाल कंधारे, मुसाब उर्फ मुसा इलाही शेख, अक्षय गोगावले, विपुल माझीरे आणि अन्य तीन साथीदारांचा समावेश होता. संतोष धुमाळ (वय 38, रा. भूगाव, ता. मुळशी) आणि मुसाब (29, रा. सिद्धीविनायक कॉलनी, शास्त्रीनगर) यांना अटक केली होती.

याप्रकरणात जामीन मिळण्यासाठी घायवळ (Pune News) याने अ‍ॅड. आबाद पोंडा आणि अ‍ॅड. विपुल दुषींग आणि अ‍ॅड. मनिष पाडेकर यांच्यामार्फत अर्ज केला होता. गुन्हा घडल्यानंतर तबल दोन वर्षांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा घडला तेव्हा घायवळ तुरुंगात होता. यासह अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवत न्यायालयाने जामीन मंजूर केला. दोन आठवड्यांच्या आत पासपोर्ट तपास अधिकार्‍यांकडे जमा करायचा आणि गुन्ह्यातील पुराव्याशी छेडछाड करायची नाही या अटींवर जामीन दिला आहे. यामध्ये न्यायालयाने १६ महिन्यांचा गुन्हा दाखल करण्यास झालेला उशीर, त्यावेळी घायवळ कारागृहात असल्याचा बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरला.

Yerawada News : मीटर जोरात पळतोय म्हणत रिक्षा चालकाला प्रवाशाकडून बेदम मारहाण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.