Pune News : पालिकेकडून राजाराम पूल ते फन टाईम चित्रपटगृहापर्यंत उड्डाणपूलाची फेर निविदा

एमपीसी न्यूज : पालिकेकडून राजाराम पूल ते फन टाईम चित्रपटगृहापर्यंत उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या कामासाठी प्रशासनाकडून फेरनिविदा काढण्यात आली आहे. यापूर्वी काढण्यात आलेले निविदांचे दर अधिक असल्याने ही निविदा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा निविदा काढण्यात आल्या आहेत.

सिंहगड रस्ता परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले आहे. तर या भागाकडे जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन या रस्त्यावर ताशी अवघे 7 ते 8 किलोमीटर वाहनांचा वेग असतो. त्यामुळे या रस्त्याला पर्यायी रस्ता करण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी पालिकेने नदीपात्रातून विठ्ठलवाडी ते वारजे रस्ता विकसितही केला होता.

मात्र, पर्यावरणप्रेमींनी या रस्त्यास विरोध केल्याने हा रस्ता उखडून टाकण्यात आला, त्यानंतर या भागातील स्थानिक नगरसेवकांकडून वारंवार या रस्त्याला पर्यायी रस्ता अथवा उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर गेली तीन वर्षे या रस्त्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षी प्रशासनाने या पुलाचा प्रकल्प आराखडा करून दोन पूल प्रस्तावित केले आहेत, त्यात एक पूल राजाराम पूल चौकात स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तर दुसरा पूल राजाराम पुलापासून थेट फलटाईमपर्यंत असणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुर होणार आहे.

मागील वर्षी पुलासाठी काढलेल्या जादा दराने आल्याने रद्द करण आल्या होत्या. त्यानंतर फेर निविदा जाहीर करण्यात अली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.