Pune News : भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ तर्फे ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजीज’ विषयावर राष्ट्रीय परिसंवाद

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्यूरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) तर्फे ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजीज इन अ वुका वर्ल्ड’  या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. 

 

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी होते.

 

या परिसंवादामध्ये  राजेश वेगाड (रीजनल सेल्स मॅनेजर – साऊथ एशिया,कॉगनेक्स कार्पोरेशन), रॉनी रूंदलेट, एक्झिक्युटिव्ह, हिंदुस्थान यूनिलीवर लिमिटेड ) यांनी एमबीए आणि बीबीएच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. योगेश गुरव, डॉ. विजय फाळके, स्वप्निल थोरात, आयएमईडी मार्केटींग क्लब सदस्यांनी हा परिसंवाद यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.