Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी प्रमोदसिंह गोतारणे

एमपीसी न्यूज –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी प्रमोदसिंह गोतारणे यांची नियुक्ती करण्यात (Pune News) आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी गोतारणे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Pune news: हांडेवाडी येथे आगीत वाहने भस्मसात

यापूर्वी गोतारणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजहित डोळ्यासमोर ठेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच आगामी काळात शहरातील महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास गोतारणे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.