Pune News : ‘वेताळ टेकडी बचाव’ करीता पुणेकरांची सह्यांची मोहीम 

Punekar's signature campaign for 'Vetal Tekdi Bachao'

एमपीसी न्यूज : एकीकडे महापालिकेकडून जैवविविधता प्रकल्पांचा गाजावाजा केला जात आहे. तर दुसरीकडे वेताळ टेकडीच्या डोंगराच्या उतारावरील आणि टेकडीवरील गवताळ जमीन, जंगले, पक्षी आणि जलचर प्राणी यांचे अस्तित्व उत्खनन अतिक्रमणांमुळे धोक्यात आले आहे. ‘वेताळ टेकडी बजाव’ करीता सजग पुणेकरांनी सह्यांची मोहीम राबवली आहे.

वेताळ टेकडीला भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक वारसा म्हणून जतन करण्याचे आपल्या सर्वांचे हित आहे. परंतु टेकडीच्या शिखरावर एका नामांकीत शिक्षण संस्थेकडून खोदाई करून 20 फूट रुंद रस्ता तयार केला जात आहे.

त्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खननामुळे अतोनात नुकसान होत आहे. पुणे महापालिकेने घटनास्थळाची पाहणी करून काम थांबवले आहे.

परंतु सदर संस्थेकडून पुन्हा परवानगीसाठी अर्ज केला आहे. परंतु या भागातील रहिवासी तसेच संपूर्ण पुण्यातील सजग नागरिकांचा कडाडून विरोध करूनही रस्त्याकडे जाण्याची योजना आखली आहे.

वेताळ टेकडी ही मौल्यवान जैवविविधतेचे भांडार म्हणून ओळखली जाते. प्रदुषणमुक्त हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी या टेकडीची मदत होते. हवेतील कार्बनच्या प्रमाणात घट होण्यास व भूजल पुनर्भरण वाढ यासाठी टेकडीवरील जैवविविधता टिकली पाहिजे.

अन्यथा भूस्खलन आणि झाडतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू शकेल. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी वेताळ टेकडी बचाव ऑनलाईन सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. आजअखेर 7 हजारांहून जास्त पुणेकरांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.