Pune News : वेळेचे उल्लंघन करत डीजे वाजवल्याप्रकरणी कोरा कॉकटेल बारच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : घालून दिलेल्या (Pune News) नियमांचे आणि वेळेचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावून, संगीत वाजवून उपद्रव केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेलचे मॅनेजर आणि डीजेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. यावेळी हॉटेलमधील साऊंड सिस्टिम डीजे मिक्सर जप्त करण्यात आले आहेत.

शहरात वेळेचे आणि घालून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांवर मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखेकडून कारवाई केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली आहे.

3 डिसेंबर रोजी हॉटेल चालक हॉटेल मॅनेजर आणि डीजे (Pune News) चालवणारे रात्री उशिरापर्यंत संगीत वाजवून उपद्रव करत असताना आढळून आले. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे पोलिस राणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Old Katraj Ghat : जुन्या कात्रज घाटातून सातारा-पुणे रहदारी 31 डिसेंबरपर्यंत बंद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.