Pune News : इंदिरा गांधींचे उदाहरण देत शरद पवार यांनी दिला ठाकरे गटाला धीर

एमपीसी न्यूज : ‘धनुष्यबाण’ चिन्ह गमावल्याने उद्धव ठाकरे (Pune News) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, कारण जनता त्यांचे नवे चिन्ह स्वीकारणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 1978 मध्ये नवे चिन्ह निवडले होते, पण त्यामुळे पक्षाचे नुकसान झाले नव्हते, याची आठवण शरद पवार यांनी करून दिली. एकनाथ शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देऊन त्यांना ‘धनुष्यबाण’ हे मूळ चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (EC) निर्णयावर पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘निर्णय आला की चर्चा करू नये’, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी ठाकरे गटाला दिला आहे. ते स्वीकारा, नवीन चिन्ह घ्या. काहीही फरक पडणार नाही.

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा आज दिवसभर विस्कळीत राहणार

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय ‘अनप्रेडिक्टेबल’ असल्याचे म्हटले आणि निवडणूक आयोगाला निकाल देण्याची घाई का झाली, असा (Pune News) सवाल केला. शिवसेनेचे सर्वसामान्य कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहतील, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.