Pune News : टेमघर धरणाच्या गळतीचे प्रमाण कमी-देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज -टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी दुरुस्तीच्या कामावर 91कोटी 66 लाख रुपये खर्च झाला आहे. धरणाच्या एकूण कामाकरिता आतापर्यंत 456 कोटी 58 लाख रुपये इतका खर्च झाला आहे. सहा वर्षांपूर्वी धरणातून पाणीगळतीचे प्रमाण 2 हजार 587 लिटर प्रति सेकंद एवढे होते.दुरुस्तीमुळे गळतीचे प्रमाण 96 टक्के म्हणजे 197 लिटर प्रति सेकंद एवढे कमी झाले (Pune News) असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिली आहे. दरम्यान, सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी दुरुस्तीचे काम जुलै 2020 पासून थांबविण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

 

 

टेमघर धरणातून पाण्याची गळती होत असल्याबाबत आमदारांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना जलसंपदामंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.धरणातून होणारी गळती रोखण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू करण्यात आली होती.

 

Cantonment Election : पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील 57 बोर्डांच्या निवडणुका रद्द!

 

ही कामे 100 टक्के पूर्ण करण्यासाठी चालू निविदेतील 52.95 कोटी रुपये व अद्याप निविदा निश्चित न झालेल्या कामासाठी 46.08 कोटी अतिरिक्त निधी आवश्‍यक आहे. धरणाची गळती रोखण्याच्या कामांकरिता 99 कोटी व धरण सुरक्षिततेच्या कामांसाठी 95  कोटी 57  लाख रुपये प्रस्तावित आहेत. हा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला असून प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येत आहे. टेमघर प्रकल्पास द्वितीय प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने हाती घेण्याचे नियोजित असल्याचे फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.