Pune News : जिल्हा ऑल आउट ऑपरेशन दरम्यान दोन फरारी आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरारी असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात दहशतवाद विरोधी पथकाला यश आले आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात गुरुवारी (दि.08) कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले त्यावेळी त्यांना जेरबंद करण्यात आले.

संकेत निवृत्ती खुडे (वय 25) व ऋषिकेश निवृत्ती खुडे (वय 20) ( रा. मोरवाडी, ता. भोर, जिल्हा पुणे ) असे अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरारी असलेल्या दोन आरोपींना कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान नसरापुर परिसरातून ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना राजगड पोलीस ठाण्याला सुपूर्द केले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात, पोलीस हवालदार अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, महेंद्र कोरवी, किरण कुसाळकर, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व अरुण पवार या पथकाने केली. सायबर पोलीस स्टेशनचे सुनिल कोळी व चेतन पाटील यांनी तांत्रिक मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.