Pune : आता पक्षश्रेष्ठींची जबाबदारी, मला त्यांनी परत बोलावलं पाहिजे – सत्यजित तांबे

    सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षात परतण्याचे दिले संकेत

एमपीसी न्यूज – आता पक्षश्रेष्ठींची जबाबदारी, मला त्यांनी (Pune) परत बोलावलं पाहिजे असे वक्तव्य अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पुणे दौर्‍यावर असताना केले.

नाशिक पदवीधर निवडणुकी दरम्यान सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर, काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली होती. तरी देखील पदवीधर मतदार संघातून ते प्रचंड मतांनी  निवडून आले होते.  या निवडणुकीला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला. त्या दरम्यान राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. पण सत्यजित तांबे नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्यापही निश्चित झाले नाही.

Mahalunge : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

या राजकीय घडामोडी दरम्यान  सत्यजित तांबे आज पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांना काँग्रेस पक्षात जाणार का असे विचारण्यात आले. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, काँग्रेसमधील काही ठराविक लोकांनी मला टार्गेट करून बाहेर काढलं. आमच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहेत. मला पक्षातून काही लोकांनी बाहेर ढकलून दिलं असलं तरी आता पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की, मला त्यांनी परत बोलावलं पाहिजे.

पण अद्यापपर्यंत अशी कुठलीही हालचाल झालेली नाही. निवडणुकीच्या काळात जो काही एपिसोड झाला. तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि कशा पद्धतीने माझ्या बरोबर राजकारण झालं आणि कशा पद्धतीने पक्षातून बाहेर ढकलण्यात आले. मी काही एकटाच नाही तर देशात माझ्या सारखे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांना नेत्याकडून ठराविक ठिकाणी टार्गेट करून ढकलण्यात येत आहे. ही चिंतेची बाब असून यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे असल्याची भूमिका मांडत सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षात परतण्याचे संकेत दिले (Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.