Pune : …आता मुरलीधर अण्णा यांचे काय होणार?

एमपीसी न्यूज – माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी (Pune) यांना राज्यसभेचे तिकीट दिल्यानंतर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आगामी पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून शक्तिप्रदर्शन केले आहे. कुलकर्णी आणि मोहोळ यांचे फारसे काही पटत नाही. 2014 आणि 2019 च्या कोथरूड विधानसभा निवडणुकीत मोहोळ प्रबळ दावेदार होते. मात्र, भाजपने त्यांना संधीच दिली नाही. त्यानंतर 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत मोहोळ विजयी झाले. त्यांना पक्षाने स्थायी समिती अध्यक्षपद दिले. त्यानंतर महापौर पदही दिले. त्यानंतर आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांचे नाव प्रथम क्रमांकावर आले आहे. तर, दुसरीकडे माजी आमदार जगदीश मुळीक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांनीही पुणे लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Rajya Sabha Election : ठरलं! राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी

मोहोळ यांचे भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळींशी मधुर संबंध आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना हे वरिष्ठ नेते मंडळी आवर्जून हजेरी लावतात. शिवाय स्थानिक नेते मंडळीही जातीने हजर राहतात. पुण्याचा आगामी खासदार हा स्थानिक असावा, अशी (Pune) जोरदार मागणी होत आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा निवडणूक होणार आहे.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झाले. मोदी लाट असल्याने या उमेदवारांना त्याचा फायदा झाला. 2024 च्या निवडणुकीतही मोदी लाट कायम राहणार असल्याचा दावा भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळींकडून केला जात आहे. तर, कसबा पोटनिवडणुकीत ज्या प्रकारे माहायुतीचा उमेदवार विजयी झाला. त्याचप्रमाणे पुणे लोकसभा निवडणुकीतही आमचा उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.