Rajya Sabha Election : ठरलं! राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी

एमपीसी न्यूज : महायुतीतील भाजप (Rajya Sabha Election) आणि शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यसभा उमेदवार जाहीर केला आहे. पार्थ पवार आणि बाबा सिद्धिकी यांच्या नावाची चर्चा असताना खासदार प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. 

खासदार प्रफुल्ल पटेल यांचा 2027 मध्ये कार्यकाळ संपत आहे. तांत्रिक मुद्दयांच्या आधारे हा निर्णय घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

Pune :खेडमधील वंचित कुटुंबांना मिळाली हक्काची घरे आणि स्वच्छतागृहे

उद्या 15 फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची (Rajya Sabha Election) तारीख आहे. त्यामुळे आज सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. महाराष्ट्रातून भाजपद्वारे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपचाडे तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.