Pune :’आयएमडीआर’चा पदवी प्रदान समारंभ

एमपीसी न्यूज – डीईएसच्या ‘आयएमडीआर’ संस्थेचा 49 वा ‘पदवी प्रदान समारंभ’ (Pune )माजी विद्यार्थी व गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे (केमिकल्स) मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला.

डीईएसच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तंत्रज्ञानाचा अंगीकार आणि आजीवन शिक्षण महत्त्वाचे असल्याचे मत विशाल शर्मा यांनी व्यक्त केले.

तुम्हाला जे काम मिळेल त्यातून शिकायचे आहे. कामावर प्रेम करा (Pune )म्हणजे यश मिळेल. इतरांच्या यशाने आनंदी होणे हा जीवन आनंदी करण्याचा मार्ग आहे असे रावत यांनी सांगितले.

Pune : …आता मुरलीधर अण्णा यांचे काय होणार?

अर्णव आपटे यांना सुवर्ण आणि सिद्धीका जाधव यांना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.
डीईएसचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, विश्वस्त जगदीश कदम, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालिका डॉ. शिखा जैन, डॉ. विनयकुमार आचार्य, महेश आठवले, एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ सन्मथ शेट्टी, डॉ. सोनाली खुर्जेकर आणि प्रा. प्रतिक पोतदार यांनी संपादित केलेल्या ‘मिलेट्स – नेचर्स न्यूट्रिग्रेन्स’ या पुस्तकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले.
प्रा. पृथा उबगडे, प्रा. अमिता कुलकर्णी, डॉ. सन्मथ शेट्टी यांनी संयोजन केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.