Pune : कोजागिरीनिमीत्त आज पुण्यातील उद्याने राहणार मध्यरात्रीपर्यंत खुली

एमपीसी न्यूज – कोजागरी पौर्णिमेनिमित्त शहरातील उद्यानांची वेळ (Pune) वाढविण्यात आली असून, मध्यरात्री बारापर्यंत ती नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. आज (शनिवारी) पहाटे 6 ते 11 आणि सायंकाळी साडेचार ते मध्यरात्री 12 अशी उद्यानांची वेळ असेल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत (Pune) उद्यान विभागाकडून 211 उद्याने, मत्स्यालय आणि प्राणिसंग्रहालय विकसित करण्यात आले आहे. उद्यानांचे विकसन, सुशोभीकरण, देखभाल-दुरुस्तीविषयक कामे उद्यान विभागाकडून केली जातात. यातील बहुतांश मोठ्या उद्यानांमध्ये नागरिकांची नियमित गर्दी असते. कोजागरी पौर्णिमेनिमित्त दर वर्षी नागरिक उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

Talegaon Dabhade : हरित सोसायटीसाठी तळेगावकरांचा पुढाकार

त्यामुळे यंदा उद्यानांची वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी ती पहाटे 6 ते 11 आणि सायंकाळी साडेचार ते रात्री 12 पर्यंत नागरिकांसाठी खुली राहणार आहेत, अशी माहिती उद्यान विभागाकडून देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.