Talegaon Dabhade : हरित सोसायटीसाठी तळेगावकरांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – रोटीरी क्लब तळेगाव दाभाडे आणि वास्तू डेव्हलपर्स यांच्या संयुक्त (Talegaon Dabhade)विद्यमाने ‘तळेगाव ग्रीन सोसायटी मीट’ हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी 103 सोसायटी आणि बंगले धारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाणी आणि विजेची बचत करणे तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रांतपाल मंजू फडके, प्रांत 3131चे(Talegaon Dabhade) ग्रीन सोसायटी संचालक केशव ताम्हणकर, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सी ई ओ प्रदीप निकम,सर्जेराव कंडाळकर सोसायटी रजिस्ट्रार मावळ,वस्तू डेव्हलपर्सचे गौरव भेगडे,रोटरी क्लबचे अध्यक्ष उद्धव चितळे,उपाध्यक्ष कमलेश कार्ले,सचिव श्रीशैल मेंन्थे,रो निलेश भोसले हे व्यासपिठावर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला अविनाश सुतार,हर्षद झवेरी,महेश चौधरी, अविनाश सावंत,सागर काजळे,विविध सोसायटीचे प्रतिनिधी,तळेगावकर नागरिक, रोटरी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

World Cup 2023 – थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी; पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात

सोसायटी मधील पाण्याचा अपव्यय कमी करणे, सोसाटयांना सोलर हीटर किंवा सोला लाइट्ससाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, सोसायटी मधील ओला आणि सुका कचऱ्याचे कमी खर्चामध्ये विघटन करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

रोटरी क्लब डिस्ट्रेट गव्हर्नर मंजू फडके,ग्रीन सोसायटी डायरेक्टर केशव ताम्हणकर,संतोष जोशी यांनी प्रांत 3131 नी आखलेला हा कार्यक्रम अध्यक्ष उध्दव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कार्ले,सचिव श्रीशैल मेंथे यांच्या मार्गदर्शनाखाली रो निलेश भोसले यांच्या पुढाकारातून पार पडला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद मुंगी,राजन आंब्रे,विश्वनाथ मराठे, भालचंद्र लेले,रो मथुरे,वेदांग महाजन, चेतन नामजोशी,अमित निऊंगुने,राजू गोडबोले,आनंद असवले,संजय अडसूळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.