Khadki : खडकी येथे 191 मुलींची मिरवणूक काढत उत्साहत कन्यापूजन साजरे

एमपीसी न्यूज – खडकी येथे आगरवाल समाज खडकी और अपना वैश्य समाज, (Khadki) पुणे- महाराष्ट्र यांच्यावतीने सोमवारी (दि.23) 191 मुली व 11 भोरव स्वरुप मुलांचे पूजन करण्यात आले. यावेळी मुलांची ध्वज, पताका, वाद्ये आणि जय मातेच्या घोषणांनी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी बेटी पढावचे राष्ट्रीय समन्वयक डॉ.राजेंद्र फडके आणि ( Khadki ) पद्मश्री गिरीश प्रभुणे गौ सेवक व पंच गव्य डॉक्टर डॉ.दिलीप कुलकर्णी, संघाचे कार्यवाह विलास जी लांडगे, भाजपा आयटी सेलचे राज्य समन्वयक – प्रा.संजीवनी पांडे आणि SVS शाळेचे प्राध्यापक, शिक्षक व विश्वस्त फ्रान्सिस डेव्हिड आणि सुमारे 150 भाविक व कुटुंबिय उपस्थित होते.

World Cup 2023 – थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी; पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात

कन्या पूजनानंतर शिव दुर्ग मित्र, लोणावळा या निस्वार्थ समाजकार्य, जनहिताचे कार्य, निस्वार्थ सेवा तसेच गड-किल्ल्यांच्या संवर्धनात कार्यरत असलेल्या संस्थेचा मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि मनोबल वाढवणारी काही साधने देऊन गौरव करण्यात आला.

पंतप्रधान मोदीजींच्या बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाच्या संकल्पनेतून मुला-मुलींच्या जन्म संतुलनात बदल आणि मुलगा-मुलगी भेदभाव दूर करणे आणि जनजागृतीचा प्रभावी परिणाम देशभरात दिसून येत आहे.त्यामुळे डॉ. राजेंद्र फडके जी यांनी प्रभावी कार्य केले आहे.आणि प्रभावी भाषणाने सर्वांना जागरूक केले.

आयोजक अग्रवाल समाज खडकीचे अध्यक्ष दीपक काश्मिरीलाल अग्रवाल व संपूर्ण कार्यकारिणीसह अपना वैश्य समाजाचे देवीलाल जालान, अनिल ओंकारमल अग्रवाल, घनशाम अग्रवाल, निरुपमा अग्रवाल, छजुरामजी मित्तल, बाल भिंगारकर, लक्ष्मीनारायण बन्सल, राजेंद्र बन्सल, रुक्मिणी मित्तल, अनिता अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला 137 कुटुंबांनी सहकार्य केले व पुण्य लाभले.संयोजक अग्रसैनिक सुधीरकुमार अग्रवाल यांनी सांगितले व आपल्या वैश्य समाजाने वर्षभरात जनहित व राष्ट्र उभारणीसाठी केलेल्या कार्यक्रमांची माहिती देऊन कार्यक्रमाची सांगता केली. आभार सचिव राहुल अग्रवाल यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.