Pune News : पीएमपीएमएल बस अपघात, अनेक गाड्यांना दिली धडक

एमपीसी न्यूज : पुण्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यातील वाकडेवाडी येथे पीएमपीएमएल बसने दुचाकीस्वारासह अनेक गाड्यांना धडक दिली. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. बुधवारी (28 डिसेंबर) रात्री 8 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. 

बस सुसाट वेगात असताना अचानक बसचे ब्रेक फेल झाले. काल रात्री झालेल्या या अपघातात बसने समोरून जाणाऱ्या दोन दुचाकींसह रिक्षा, टेम्पो आणि एका 407 गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बसने दुचाकीस्वाराला 200 ते 300 फूट फरफटत नेलं. तसेच समोरून जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.

बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात  झाला असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. पुण्यातील वाकडेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास प्रवाशांना घेऊन जाणारी पीएमपीएमएल बस वाकडेवाडी परिसरात आली.

या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. याशिवाय कारच्या पाठीमागच्या सीटवर बसलेली महिला देखील जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुचाकीस्वार व्यक्तीवर जहांगीर तर कारमधील महिलेवर संचेती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.