Daund : पाच हजाराची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज- हरवलेल्या बहिणीचा शोध घेण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजाराची लाच स्वीकारताना दौंड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, शनिवारी कारवाई करून रंगेहाथ पकडले.

बापू नामदेव रोटे (वय 40, रा.दौंड) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपली बहीण गेल्या दोन महिन्यांपासून हरवली असल्याच्या संदर्भात दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हरवलेल्या बहिणीचा शोध घेण्यासाठी पोलीस कर्मचारी बापू रोटे यांनी फिर्यादीकडे 5 हजारांची लाच मागितली. याप्रकरणी फिर्यादिने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता अधिकाऱ्यांनी खातरजमा करून सापळा रचून बापू रोटे याला 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.