Pune : विमाननगर परिसरातील ‘स्पा’मध्ये पोलिसांचा छापा, हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज – विमाननगर परिसरातील ‘स्पा’मध्ये छापा टाकून पोलिसांनी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विमाननगर परिसरातील पेशवा कॉम्पलेक्समधील टॅन्सी वेलनेस स्पामध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला असता स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे लक्षात आले..पोलिसांनी यावेळी थायलंडच्या ३ महिलांची सुटका केली असून स्पा चा व्यवस्थापक रंजनकुमार पासवान याला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.