Kamshet : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; वाहनांत खोचून ठेवली तलवार

आठवड्यातील दुसरी घटना

एमपीसी न्यूज – कामशेत शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात गुरुवारी ( दि. ११) रोजी पहाटे सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना संशयास्पद आढळलेल्या दोघांची झडती घेतल्यावर त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या डिकीमध्ये दोन फुट लांब धारधार तालावर सापडली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी तानाजी शिवाजी शेळके (वय २२) किरण पांडुरंग आतकर ( वय २१ दोघे रा. करंजगाव ता. मावळ ) यांना अटक केली आहे.

याबाबत कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी ( दि. ११) रोजी पहाटे सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास रात्रीची गस्तीस असलेले पोलीस नाईक रामचंद्र कानगुडे यांना तानाजी शिवाजी शेळके आणि किरण पांडुरंग आतकर यांची हालचाल संशयास्पद आढळून आली.

यावेळी त्यांची चौकशी केली असता त्यांनी अडखळत उत्तरे दिल्याने संशय वाढला. यावेळी गस्तीवर असलेले अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी. बी. पाटील यांच्या समवेत दोन पंचांच्या समक्ष वाहनाची झडती घेतली असता त्याच्या दुचाकी (एमएच १४ एफजे ७९३१) मध्ये सीटच्या खाली डिकीमध्ये डाव्या बाजूला दोन फुट लांबीची तलवार सापडली. या तलवारप्रकरणी विचारले असता या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केली आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. बी. पाटील करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.