Pune : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अतिक्रमण कारवाईदरम्यान हातगाडी व त्यावरील वस्तू उचलून नेल्याप्रकरणी एका व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 जानेवारी 2019 रोजी हा प्रकार घडला होता. बालाजी वायकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. वायकर यांचे सिंहगड रस्त्यावरील रामकृष्ण मठासमोर हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे.

वायकर यांच्याकडे परवाना असतानाही अतिक्रमण विभागाने अतिक्रमण कारवाईत त्यांची हातगाडी आणि माल उचलून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक धुमाळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.