Pune Police : आगामी कार्यक्रमांच्या अनुषंगाने पुण्यात निर्बंध लागू

एमपीसी न्यूज : आगामी नववर्ष, 1 जानेवारी विजयस्तंभ अभिवादन (Pune Police) आणि राजकीय मागण्या, मोर्चे याला अनुसरून पुणे ग्रामीण जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी 7 जानेवारीपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न उद्भवू नये यासाठी निर्बंध लागू केले आहेत.  

पुणे ग्रामीण जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी 7 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 ची कलम 37 (1) व (3) चे आदेशान्वये निर्बंध लागू करण्यात आयले आहे. हे निर्बंध पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये 26 डिसेंबर 2022 रोजी रात्री 12.05 वाजल्यापासून ते 7 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पत्रानुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यात विविध मागण्यासाठी पक्ष व संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने इत्यादीचे आयोजन केले जात आहे. तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात लोणावळा व हवेली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसेच, 1 जानेवारी 2023 रोजी लोणीकंद पोलीस ठाणे (पुणे शहर पोलीस आयुक्तालय) हद्दीमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी जयस्तंभास मानवंदना कार्यक्रम साजरा करण्यासाठी येत असतात. जयस्तंभ येथे मानवंदना दिल्यानंतर मोठ्या संख्येने अनुयायी मौजे. वढू बुद्रुक येथील गोविंद गोपाल गायकवाड यांच्या समाधीस्थळी भेट देतात. या कारणास्तव पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (1) व (3) चे आदेश जारी करणे आवश्यक वाटते, असे आदेशात म्हटले आहे.

पुढील निर्बंध लागू – Pune Police

1) कोणताही दाहक, पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे.
2) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे.
3) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक ईजा करण्यासाठी वापरातील अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
4) कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढार्‍यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.
5) जमाव तयार करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे
6) ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.
7) ज्यायोगे वरील परिसरात कायदा वस्ती व्यवस्था धोक्यातील अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 ची कलम 37 (1) व (3) विरुद्ध वर्तन करणे
8) महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 ची कलम 37 (1) चे पोर्ट कलम (3) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या परवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढणे.

वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य कृतीसाठी सत्यार्थ बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल, असे पोलिसांनी आपल्या पत्रकामध्ये म्हंटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.