PCMC: अनाधिकृत नळजोडधारकांवर 1 जानेवारीपासून फौजदारी गुन्हे; महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज – शहरातील अनाधिकृत (PCMC) नळजोडणी नियमित करण्याच्या मोहिमेस 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत आहे. 15 मिली मीटर व्यासाच्या घरगुती अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी नागरिकांनी तातडीने अर्ज सादर करून नळजोडणी अधिकृत करून घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे. 1 जानेवारी 2023 पासून अनाधिकृत नळजोड आढळल्यास अनाधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या अनाधिकृत नळजोडणीच्या तक्रारी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील अनाधिकृत नळ जोडणी नियमित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेची परिणामकारता वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी नळजोड नियमितीकरण मोहिमेस मुदत वाढ देण्यात आली आहे.

Pune Police : आगामी कार्यक्रमांच्या अनुषंगाने पुण्यात निर्बंध लागू

नियमात बसत असलेल्या 15 मिली मीटर व्यासाच्या रहिवासी अनाधिकृत (PCMC) नळजोडधारकांनी या अंतिम संधीचा लाभ घेत नळजोड नियमित करून घ्यावे. यासाठी 31 डिसेंबर 2022 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये दाखल करावे, तसेच याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे सह शहर अभियंता सवणे यांनी सांगितले. 1 जानेवारी 2013 पासून अनाधिकृत नळजोड तोडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असून अनाधिकृत नळजोड आढळल्यास अनाधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.