Dighi News : दिघी रोड येथून 11 हजार रुपयांच्या गुटख्यासह एकाला अटक

एमपीसी न्यूज – दिघी रोड येथून (Dighi) पोलिसांनी एकाला 11 हजार रुपायांचा गुटखा व दुचाकीसह अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि.26) दुपारी केली.

खेतराम रामाजी चौधरी (वय 58 रा.भोसरी) याला पोलिसांनी अटक केली असून दिनेश खेतराम चौधरी (वय 24) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन विष्णू सातपुते (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे.

PCMC: अनाधिकृत नळजोडधारकांवर 1 जानेवारीपासून फौजदारी गुन्हे; महापालिकेचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून पोलिसांनी 11 हजार रुपयांचा गुटखा व 70 हजार रुपयांची दुचाकी असा एवज जप्त केला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.