Mahalunge : तलवारीसह 18 वर्षीय तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – महाळुंगे येथून (Mahalunge) एका 18 वर्षीय तरुणाला पोलिसांनी तलवारीसह अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.26) चाकण तळेगाव रोडवर करण्यात आली आहे.

निखील देवराम देवरे (वय 18 रा.खराबवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राजेंद्र परमेश्वर खेडकर यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dighi News : दिघी रोड येथून 11 हजार रुपयांच्या गुटख्यासह एकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना खबर (Mahalunge) मिळाली की, चाकणच्या दिशेने आरोपी दुचाकीवरून (एमएच 14 डी.सी.0813) तलवार ताब्यात घेऊन जात असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याक़डे असलेली 200 रुपायांची लोखंडी तलवार जप्त केली. महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.