Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड आरटीओमार्फत वाहन चालकांचे वाहतूक नियमांबद्दल समुपदेशन आणि अंमलबजावणी

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आरटीओमार्फत वाहन चालकांचे वाहतूक नियमांबद्दल समुपदेशन आणि अंमलबजावणीसाठी मोहीम सुरु आहे. याबद्दल माहिती देताना, पिंपरी चिंचवडचे आरटीओ डेप्युटी अतुल आडे म्हणाले, की परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम 1 डिसेंबर 2022 पासून ते 31 मे 2023 पर्यंत म्हणजेच 6 महिने राबविली जाणार आहे.

ही मोहीम जुने आणि नवीन पुणे- मुंबई महामार्गांवर राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि वाहतुकीत शिस्तबद्धता आणणे. ही मोहीम राबविण्यासाठी 12 पथके आणि 30 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Red Zone: रावेत, किवळे रेडझोन हे भाजपचेच कारस्थान – अजित गव्हाणे

आज ही मोहीम उर्से टोल नाक्याजवळ (Pimpri Chinchwad) राबविली जात आहे. वाहनचालकांना येथे थांबवून वाहतुकीचे नियम पाळण्यास सांगितले जात आहे. त्यांना सीट बेल्ट वापरणे, ओव्हरस्पीडींग करू नये, लेन कटिंग करू नये असे सांगण्यात येत आहे. जेणेकरून जीवित हानी होऊ नये. त्यांना वाहतूक नियम पाळण्यासंदर्भात शपथ देण्यात येत आहे. तसेच त्यांना प्रमाणपत्र दिले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.