Pune : पुणेकरांनो ..आता आठवड्याच्या सुट्टी दिवशी करा धार्मिक स्थळांचे पर्यटन

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून वातानुकूलीत पर्यटन बससेवा क्र. 2 चा शुभारंभ

एमपीसी न्यूज- पुणेकरांनो , आठवड्याच्या (Pune) सुट्टी दिवशी कुठे जायचे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर पुणे महानगर परिवहन महामंडळाने तुमच्या प्रश्नाचे उत्तर सोडविले आहे. कारण पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून धार्मिक स्थळांचे पर्यटन करण्यासाठी  पर्यटन  बससेवा क्र. 2  चा शुभारंभ आज करण्यात आला आहे. 

आज ( दि. 14)  हडपसर गाडीतळ येथे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे उपस्थित राहुन शुभारंभ केला.

यावेळी सहव्यवस्थापकीय संचालिका  प्रज्ञा पोतदार-पवार, चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, प्र.कामगार व जनता संपर्क अधिकारी अल्ताफ सय्यद, महामंडळाचे अधिकारी  विजय रांजणे,  शैलेश जगताप, मोहन दडस, समीर अत्तार, सुरेंद्र दांगट व कर्मचारी उपस्थित होते.

Chakan : केशकर्तनालायातील नंबरवरून दोघांना बेदम मारहाण

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर व 16 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून धार्मिक व पर्यटनस्थळांकरिता 7 पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष’पर्यटन बस’सेवा प्रत्येकआठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दिनांक 01 मे पासून सुरू करण्यात आलेली आहे. या ‘पर्यटन बस’ सेवेकारिता प्रति प्रवासी तिकीट दर रूपये 500/- इतका आकारण्यात येतो.

हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर या मार्गावरील ‘पर्यटनबस’ला सहव्यवस्थापकीय संचालिका  प्रज्ञा पोतदार-पवार व चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन)  सतीश गव्हाणे यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली.

या वेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया म्हणाले कि, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात येत असलेल्या वातानुकूलीत पर्यटन बससेवेचा लाभ भाविक व पर्यटक (Pune) यांनी घ्यावा .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.