Vadgaon Maval : उपनगराध्यक्षांनी स्वतः आठवडे बाजारात केली 100 टक्के करवसुली

एमपीसी न्यूज – वडगाव शहरात (Vadgaon Maval ) दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार तालुक्यात प्रसिद्ध आहे. बाजाराच्या दिवशी नगरपंचायत प्रत्येक विक्रेत्याकडून स्वच्छता व आरोग्य आणि जागा भाडे म्हणून कर पावती आकरत असते. एरवी आठवडे बाजारातून नगरपंचायतला केवळ 50 टक्के महसूल जमा होत असे. म्हाळसकर यांच्या निर्णयामुळे 100 टक्के महसूल जमा झाला.यावेळी नगरपंचायत कर्मचारी शंकर ढोरे, रवी साबळे,प्रदीप तुमकर,रमेश कचरे आदी जण उपस्थित होते.
 वडगाव शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार तालुक्यात चांगलाच प्रसिद्ध आहे .या दिवशी अनेक शेतकरी व व्यापारी आपला शेती माल तसेच किरकोळ वस्तू विक्रीसाठी बाजारात आणत असतात आणि त्या खरेदी करण्यासाठी शहर व पंचक्रोशीतून महिला व नागरिक मोठी गर्दी करत असतात.

Pune : पुणेकरांनो ..आता आठवड्याच्या सुट्टी दिवशी करा धार्मिक स्थळांचे पर्यटन 

आठवडे बाजाराचे दिवशी नगरपंचायत प्रत्येक विक्रेत्याकडून स्वच्छता व आरोग्य आणि जागा भाडे म्हणून कर पावती आकरत असते मात्र तो कर पूर्णपणे वसूल होतो का? किंवा कर्मचाऱ्यांकडून नगरपंचायतीकडे जमा केला जातो का? याची खातर-जमा करण्यासाठी व त्यातील पारदर्शकता पाहण्यासाठी वडगाव नगरपंचायतच्या विद्यमान उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांनी स्वतः आठवड्या बाजारात जाऊन भाजी पाला विक्रेत्यांकडून कर आकारणी केली. एरवी आठवडे बाजारातून नगरपंचायतला फक्त 50% महसूल जमा होत असतो तर म्हाळसकर यांच्या निर्णयामुळे 100% महसूल जमा (Vadgaon Maval ) झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.