Pune : डॉ. रा. ना. दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धेत स. प. महाविद्यालय विजयी

एमपीसी न्यूज – फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Pune) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉ. रा. ना. दांडेकर चषक संस्कृत एकांकिका’ स्पर्धेत स. प. महाविद्यायाच्या चपेटिका या एकांकिकेने प्रथम क्रमांकासह विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे हे 24 वे वर्ष होते.

“मनोरंजक प्रहसन, संस्कृत व्याकरणासारख्या अनेकांना क्लिष्ट वाटणाऱ्या विषयावर आधारित प्रेक्षकांच्यात हशा पिकवणारी एकांकिका, सायकॉलॉजिकल थ्रिलर ह्या विषयाच्या जवळ जाणारी एकांकिका, मर्डर मिस्टरी, लोकांना विचार करायला प्रेरित करणाऱ्या आशयसंपन्न एकांकिका सादर केल्या.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी उपोषण घेतले मागे; आता स्वत: महाराष्ट्रात दौरा करून मराठा समाजाला भेटणार

डॉ. रा.ना.दांडेकर चषक संस्कृत एकांकिका स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:

प्रथम पारितोषिक- ‘चपेटिका’ – स. प. महाविद्यालय (Pune)
द्वितीय पारितोषिक- ‘त्यागादेव तु कैवल्यम् ‘ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
तृतीय पारितोषिक- ‘प्रत्ययलोपे प्रत्ययलक्षणम्’ – फर्ग्युसन महाविद्यालय
उत्तेजनार्थ पारितोषिक- ‘द्वन्द्वम्’ डेक्कन महाविद्यालय (अभिमत विद्यापीठ)

डॉ. गौरी मोघे, तन्मय भोळे आणि अमोघ प्रभूदेसाई यांनी परीक्षन केले. उपप्राचार्या डॉ. राधिका जाधव, डॉ. सविता केळकर, संस्कृत विभागप्रमुख प्रा. अंकित रावल यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.