Pune : साधू वासवानी उड्डाणपूल धोकादायक झाल्याने उद्यापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

एमपीसी न्यूज –  साधू वासवानी उड्डाणपूल धोकादायक झाल्याने ( Pune) हा पूल उद्या (शनिवार) पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे. त्यामुळे या भागातील वाहनांसाठी पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दरम्यान, हा उड्डाणपूल पाडून टाकून तेथे नव्याने पूल बांधला जाणार आहे.

Pune : प्रशासकीय इमारतींची कामे करतांना आगामी 100 वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा – अजित पवार

सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे 50 वर्षांपूर्वी साधू वासवानी उड्डाणपुलाचे बांधकाम केले आहे. या उड्डाणपुलाचे आयुर्मान संपत आल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे महापालिकेने या उड्डाणपुलावरील अवजड वाहतूक बंद केली होती. तसेच गेले वर्षभर डागडुजी करण्याचा प्रयत्न केला. 6 जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर पुढील दहा ते पंधरा दिवस वाहतुकीची पर्याय व्यवस्था करण्यात येणार आहे.

पण त्यानंतरही उड्डाणपूल कमकुवतच राहत असल्याने त्याचे स्लॅब चे सिमेंट पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.