Maval : मावळमध्ये महायुतीत रस्सीखेच, खासदार बारणे आणि अजितदादांच्या आमदारांमध्ये जुंपली

एमपीसी न्यूज – मावळच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना आणि अजित पवार यांच्या ( Maval ) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मावळमधून पार्थ पवार यांनी निवडणूक लढविण्याची मागणी केली. तर, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असून श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला. या दोन्ही आमदारांचा बोलविता धनी वेगळा असल्याची शंका खासदार बारणे यांनी व्यक्त केली.

Pune : साधू वासवानी उड्डाणपूल धोकादायक झाल्याने उद्यापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीत आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगत प्रचाराला सुरुवात केली. मावळात शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पिंपरी, मावळमध्ये राष्ट्रवादीचे तर सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पनवेल, चिंचवडला भाजपचे आमदार असून उरणचे अपक्ष आमदार भाजपशी संलग्न आहेत.

शिंदे यांच्या शिवसेनेचा केवळ कर्जतमध्ये आमदार आहे. पक्षाचे अनेक पदाधिकारी ठाकरे गटासोबत आहेत. या राजकीय ताकदीच्या जोरावर आता अजित पवारांच्या गटाकडून मावळमधून पार्थ पवार यांनी निवडणूक लढविण्याची मागणी पुढे केली जात आहे आहे. मागीलवेळी बारणे यांनी पार्थ यांचा दोन लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता.  त्याचे उट्टे काढण्यासाठीच बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीत आपल्या ( Maval ) उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा निर्णय झाला आहे. त्यामुळे महायुतीचा मीच उमेदवार आहे. आमदारांना कोण बोलायला लावते याचा शोध घेतला पाहिजे.

महायुतीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य राहील. मावळची जागा ज्या पक्षाला सुटेल, त्या पक्षाच्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करणार आहोत. पण, पार्थ पवार यांनी मागच्यावेळी निवडणूक लढविली. नवीन असतानाही त्यांनी चांगली लढत दिली. तेव्हापासून आजपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या ते संपर्कात आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर ते निवडून येतील अशी खात्री आहे. पार्थ यांनी मावळमधून निवडणूक लढवावी अशी  इच्छा आमदार बनसोडे यांनी ( Maval ) व्यक्त केली.

तर, मावळची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पाहिजे या मागणीवर मी आजही ठाम असल्याचे सांगत आमदार शेळके म्हणाले, राष्ट्रवादीला मानणारा चांगला वर्ग मावळमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांना गृहीत न धरता आणि केवळ मोदी यांच्या करिष्म्यावर जनता मतदार करेल असा पद्धतीने न करता,  खासदारांनी नऊ वर्षात काय केले हे जनतेला सांगावे. मावळ तालुक्यातील एखाद्या खासदार झाला पाहिजे. मात्र बारणे यांना उमेदवारी मिळाल्यास युतीचा धर्म पाळणे माझी नैतिक जबाबदारी आहे. पण, आम्हाला गृहीत धरू नका, असा इशाराच ( Maval ) त्यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.