Pune : धक्कादायक! पथ विभागातील उपअभियंत्याकडे सापडले 2 ते 3 लाखांचे बंडल

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या (Pune) पथ विभागातील एका उपअभियांत्याच्या टेबलच्या ड्रॅावरमध्ये मोठी रक्कम सापडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. जवळपास 2 ते 3 लाखांची ही रक्कम आहे.

आपचे पिंपरी – चिंचवड युवक शहराध्यक्ष रविकांत काळे हे कामानिमित्त महापालिकेच्या पथ विभागात गेले असताना त्यांना संशयास्पद हालचाली दिसली. त्यांनी रंगेहाथ पकडल्यानंतर रक्कम आपली नसल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केला. त्यानंतर आपचे कार्यकर्ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर उपअभियंता नोटांच्या बंडालासह फरार झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 5) दुपारी पुणे महापालिकेत घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

2 ते 3 लाखांचे हे बंडल असल्याचे समजते. रविकांत काळे हे बाणेरमधील एक तक्रार घेऊन पथ विभागाच्या अधीक्षक अभियंत्याकडे आले होते. त्यावेळी या कार्यालयातील एक कनिष्ठ अभियंत्याला एका ठेकेदाराने नोटांचे बंद असलेले पाकीट दिल्याचे काळे यांनी पाहिले. या अभियंत्याने हे पाकीट टेबलच्या ड्रॅावरमध्ये ठेवून दिले. हा सर्व प्रकार बघितल्यानंतर काळे आणि त्यांच्या साथीदाऱ्यांनी (Pune) संबंधित अभियंत्याला विचारणा केली. त्यावर या अभियंत्याने एका ठेकेदाराचे हे पैसे थोड्या वेळासाठी आपल्याकडे दिल्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यावर आपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.