Bhosari : दारू न पाजल्याने मित्रावर वार करणाऱ्यास सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

एमपीसी न्यूज – दारू पाजण्यास नकार दिल्याने ओळखीच्या तरुणाच्या डोक्यात सत्तूरने वार (Bhosari)करत खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सात वर्ष सक्त मजुरी आणि एक लाख रुपये आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली. 15 फेब्रुवारी 2020 रोजी भोसरी येथे ही घटना घडली होती.

विकास जिवन गुंजाळ (वय 26, रा शांतीनगर, भोसरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

न्यायाधीश पी पी जाधव यांनी शिक्षा सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गजानन बनसोडे (Bhosari)यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता नामदेव तरळगटटी यांनी शासनाच्या वतीने युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, कोर्ट अंमलदार जे एस पठाण होते.

अनिल गायकवाड (रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 15 फेब्रुवारी 2020 रोजी गायकवाड कामावरून घरी आले. त्यानंतर ते घराजवळ असलेल्या वडापावच्या गाडीवर गेले. तिथे बोलत असताना आरोपी विकास गुंजाळ गायकवाड यांच्याजवळ आला.

Bhosari : बस प्रवासात महिलेचे 75 हजारांचे दागिने पळवले

दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. विकास याने गायकवाड यांना दारू पाजण्यास सांगितले. मात्र आपल्याकडे पैसे नसल्याने आपण दारू पाजणार नाही, असे म्हणत गायकवाड यांनी विकास याला नकार दिला.

त्यानंतर विकास याने लोखंडी सत्तूरने गायकवाड यांच्या डोक्यात वार केले. त्यात गायकवाड गंभीर जखमी झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर 16 फेब्रुवारी 2020 रोजी पोलिसांनी आरोपी विकास याला अटक केली. न्यायालयाने या प्रकारात एकूण सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपीला सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपये आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.