Bhosari : बस प्रवासात महिलेचे 75 हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – बस प्रवासादरम्यान प्रवासी महिलेच्या (Bhosari) पर्स मधून 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन अनोळखी महिलांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 4) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी प्रवासी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik : अवघ्या बारा वर्षाच्या मुलाने बिबट्याला केले ऑफिसमध्ये बंद; वाचा अंगावर शहारा आणणारा प्रसंग!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी दुपारी निगडी ते वाघोली दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत (Bhosari) होत्या. बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन दोन अनोळखी महिलांनी फिर्यादी यांच्या पर्समधून 75 हजार 300 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.