Nashik : अवघ्या बारा वर्षाच्या मुलाने बिबट्याला केले ऑफिसमध्ये बंद; वाचा अंगावर शहारा आणणारा प्रसंग!

एमपीसी न्यूज : सध्या महाराष्ट्रातील (Nashik) नाशिक आणि पुणे येथे बिबट्या वावरण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच काल कात्रज येथे पिंजऱ्यातून पळून गेलेला बिबट्या 48 तासाने जेरबंद झाला. तोवर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. ही घटना ताजी असतानाच नाशिकमधील मालेगाव येथे एका सातवीत शिकणाऱ्या मुलाने प्रसंगवधान दाखवून एका बिबट्याला ऑफिसमध्ये बंद केले. त्यामुळे मोठा प्रसंग तर टळलाच पण त्याच्या धाडसीपणाचे करावे तितके कौतुक कमी आहेत.

मालेगाव येथील नामपूर गावात साई सेलिब्रेशन लॉन्स आहे. या लॉन्समध्ये मोहित अहिरे या सातवीत शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलाचे वडील वॉचमेन आहेत. रोज सकाळी 7 वाजता ते लॉन्सचे ऑफिस उघडतात. मोहित नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांसोबत येथे आला. येत असताना रस्त्यात त्याला दोन माणसे पळताना दिसली. त्याने त्या लोकांकडे दुर्लक्ष केले.

Kalewadi : श्वानाला अमानुषपणे मारहाण; एकावर गुन्हा दाखल

नेहमीप्रमाणे त्याच्या वडिलांनी ऑफिस उघडले आणि ते आंघोळीला निघून गेले. मोहित यावेळी ऑफिसमध्ये बसून आपल्या मोबाइलवर टाइमपास करत होता. यावेळी त्याला ऑफिस मध्ये प्राणी घुसल्याचा आवाज आला. त्याला आधी तो कुत्रा असेल असे वाटले. पुढे आला की त्याला हटकता येईल हा विचार त्याने केला. पण ज्यावेळी तो प्राणी पुढे आला त्यावेळी तो बिबट्या असल्याचे त्याला समजले.

त्याने प्रसंगवधान राखून कोणताही आवाज न करता दबक्या पावलाने बाहेर जाऊन ऑफिसचे दार लावून घेतले. आणि आधी वडिलांकडे धाव घेतली. तोवर त्यांना गेटसमोर पोलिस दिसले आणि पुढे बिबट्याला जेरबंद करण्यात (Nashik) आले.

मनात भीती दाटूनही मोहितने धाडस केले. जर मी हालचाल केली असती, ओरडलो असतो तर बिबट्या अंगावर आला असता म्हणून त्याचे लक्ष नसताना मी दार बंद केले. अशा प्रसंगी मोठी माणसेही गडबडून जातात, अशावेळी मात्र मोहितने संयमाने, निर्भीडपणे प्रसंगाला तोंड दिले. अन्यथा त्याच्या अथवा इतर कोणाच्याही जिवावर बेतले असते; यामुळे मोहितचे सर्वत्र कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.