Maval : पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – कामशेत येथील हरहुन्नरी व चतुरस्त्र पत्रकार(Maval) चंद्रकांत लोळे (वय 42) यांचे शुक्रवारी (दि. 8) निधन झाले. धुळे येथून मित्राला भेटून येत असताना नाशिक येथे त्यांचे निधन झाले. पत्रकारितेसह कामशेत शहरातील नामांकित लॉन्ड्री व्यावसायिक म्हणून देखील त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी,आई,दोन मुले, दोन भाऊ,भावजयी असा (Maval)मोठा परिवार आहे. ते धुळे येथे मित्राकडे गेले होते. परत येत असताना ते नाशिक येथे थांबले होते. तेथे त्यांचे निधन झाले.
लोकमत वृत्तपत्रात त्यांनी कामशेत पत्रकार म्हणून अनेक वर्ष काम केले होते.तसेच लोणावळा टाइम्स या न्युज पोर्टल व यू ट्यूब चॅनल त्यांनी सुरू केला होता.त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते.
कामशेत शहरातील नामांकित लॉन्ड्री व्यावसायिक म्हणून देखील त्यांची ओळख होती.मागील काही काळापासून ते लोणावळ्यात लॉन्ड्री मध्ये काम करत होते. पत्रकारम्हणून काम करत असताना कामशेत व मावळ तालुक्यातील अनेक विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. त्यांच्या अशा आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.