PCMC : दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यास पाच लाखांचे अर्थसाह्य

एमपीसी न्यूज – दिव्यांगांचे सामुदायिक विवाह सोहळा (PCMC)आयोजित करणाऱ्या संस्थांना महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दरवर्षी 5 लाखांचे अर्थसाह्य देण्याची नवीन योजना सुरू केली आहे.

समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी (PCMC)योजना राबविल्या जातात. झुंज दिव्यांग संस्थेच्या वतीने दरवर्षी दिव्यांगांचे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. गेल्या सात वर्षांत 52 विवाहे सोहळे त्या संस्थेने आयोजित केले आहे. या सोहळ्यास महापालिकेने अर्थसाह्य करावे, अशी मागणी त्या संस्थेने केली होती.

मानव हिताच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या सार्वजनिक संस्था व सार्वजनिक ट्रस्ट यांना अनुदान देण्याच्या योजनेच्या धर्तीवर दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थांना दरवर्षी 5 लाखांचे अर्थसाह्य देण्याचा प्रस्ताव समाज विकास विभागाने स्थायी समिती व सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. त्यांना आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक.

 

Pune: महाकवी कालिदास यांच्या काव्यावर आधारित ‘ऋतुसंहार’ या विशेष कार्यक्रमाने रंगला नादमुद्रा महोत्सव

ही रक्कम दरवर्षी एकरकमी दिली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आयोजक संस्थेला शहरात तीन वर्ष पूर्ण झालेले हवेत, अशा पात्र संस्थांना महापालिका अर्थसाह्य देणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.