Vadgaon maval : कातवी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा  

एमपीसी न्यूज – कातवी येथे आयुष पार्क तीन येथील महिलांनी (Vadgaon maval )आंतरराष्ट्रीय महिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. विविध खेळ,नृत्य,मंगळागौर असे कार्यक्रम घेण्यात आले.आयुष पार्क तीन मधील उत्सव मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण यांनी लकी ड्रॉ मधील विजेत्या महिलांना भेटवस्तू दिल्या.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण,राहुल ठवरे,किसन भानवसे,प्रशांत यादव तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिन शुक्रवार (दि 8)   यानिमित्ताने आयुष पार्क 3 कातवी या ठिकाणी तेथील महिलांनी खूप उत्साहाने आणि जल्लोषात हा दिवस साजरा केला यात अनेक प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. प्रथमतः खेळ घेण्यात आले जसे रस्सीखेच, म्युझिकल कार्ड्स इत्यादी यात सगळ्यांनी सहभाग घेऊन खूप आनंद लुटला.तसेच त्यानंतर नृत्याचे प्रकार झाले जसे मंगळागौर इत्यादी आणि क्वीज घेण्यात आले या सर्व कार्यक्रमाचे आयोजन दीपा तिवसकर यांनी केले.

Pune : भिमाशंकर येथे महादेव वन निसर्ग परिचय केंद्र

या कार्यक्रमासाठी आयुष पार्क थ्री मधील उत्सव मंडळाचे सहकार्य लाभले  (Vadgaon maval )या मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण यांनी त्यांच्यातर्फे खेळासाठी व नृत्यात भाग घेणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढून स्पिन माॅप तसेच महिलांसाठी साडी भेटवस्तू ठेवण्यात आल्या होत्या.यात महत्त्वाचे म्हणजे सर्व महिला या पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झालेल्या होत्या.
या लकी ड्रॉ सोडतीत अनुक्रमे सावित्री गुरव व अंजली जाधव या विजेत्या ठरल्या. सावित्री गुरव यांना मानाची साडी व अंजली जाधव यांना स्पिन माॅप देऊन सर्व महिला भगिनींच्या उपस्थितीत उपस्थित मान्यवरांकडून त्यांचा सन्मान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण यांनी करून सर्व महिला भगींनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल ठवरे यांनी केले तर आभार प्रशांत यादव यांनी मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.