Bhosari: सराईताकडून 16 दुचाकी जप्त, भोसरी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला  (Bhosari)भोसरी पोलिसांनी अटक केली असून 16 दुचाकी जप्त केल्या आहेत. 
योगेश शिवाजी दाभाडे (वय 24, रा. वळसाने, धुळे.) असे  अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, भोसरी परिसरात(Bhosari) दुचाकी चोरी चा शोध घेत असताना सीसीटिव्ही फुटेज मध्ये सराईत निष्पन्न झाला. त्यानुसार पोलिसांनी तपासू पथके तयार करून आरोपीला भोसरी परिसरातून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने व त्याचा साथीदार मॉन्टी वाघ (वय 22 वर्षे रा. दहिवत ता. चाळीसगाव जि. जळगाव) असे दोघांनी भोसरी, चाकण, म्हाळुंगे, खडकी, तळेगाव दाभाडे, लोणीकंद, सांगवी या परीसरातुन चोरी केलेल्या 16  मोटारसायकल काढून चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्या गड्या जप्त केल्या आहेत
आरोपी योगेश शिवाजी दाभाडे हा अट्टल मोटार सायकल चोरटा असुन त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर आयुक्तालय, नाशिक ग्रामीण , जळगाव ग्रामीण , धुळे ग्रामीण  येथे यापूर्वी मोटार सायकली चोरीचे एकुण 17 गुन्हे केले आहेत.
आरोपी कडून गुन्हयातील चोरी केलेल्या एकुण 3 लाख 84 हजार रुपयांच्या 16 मोटार सायकल हस्तगत करणेत भोसरी तपास पथकाला यश आलेले आहे.
खालील पोलीस ठाणेचे *एकुण 14 गुन्हे उघडकिस
1) भोसरी पोलीस ठाणेकडील एकुण 7गुन्हे
2) म्हाळुंगे पोलीस ठाणेकडील एकुण 2 गुन्हे
3) तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेकडील 1 गुन्हा
4 ) चाकण पोलीस ठाणेकडील 1 गुन्हा
5) सांगवी पोलीस ठाणेकडील 1 गुन्हा
6) खडकी पोलीस ठाणेकडील 1 गुन्हा
7) लोणीकंद पोलीस ठाणेकडील 1 गुन्हा
ही कामगिरी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, रूपाली बोबडे पोलीस निरीक्षक,  उपनिरीक्षक  बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक  मुकेश मोरे, पोलीस हवलदार हेमंत खरात, पोना नवनाथ पोटे, पोलीस नाईक प्रकाश भोजने महिला पोलीस नाइक मुळे, पोलीस अंमलदार स्वामी नरवडे,सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते,महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे, यांनी  केलेली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.