Vadgaon : पंचवीस हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तलाठ्यास अटक

एमपीसी न्यूज – शेतीच्या गटाची फोड केल्याची नोंद सातबारा उताऱ्यावर (Vadgaon )करण्यासाठी 25 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 18) वडगाव मावळ येथे करण्यात आली.
सखाराम कुशाबा दगडे (वय 52) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, करूज वडगाव येथे सखाराम दगडे (Vadgaon )तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांनी शेतीच्या गटाची फोड केली आहे. त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दगडे यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली.
तडजोड केल्यानंतर 25 हजारांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.