Raj Thackeray : राज ठाकरे दिल्लीला रवाना; मनसे भाजप युतीची शक्यता

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रात्री तडकाफडकी (Raj Thackeray) चार्टर विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे.

त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अगोदरच दिल्लीत जाऊन पोहोचले आहेत. राज ठाकरे हे दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटणार आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बैठक होणार आहे. ही बैठक रात्री 11 वाजता होणार आहे.

त्यामुळे आज रात्री दिल्लीत भाजप आणि मनसे युतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा ही मनसेसाठी सोडली जाणार असल्याची चर्चा होती. आज रात्री राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याने दोन्ही पक्षांमधील युतीबाबत काहीतरी ठोस घडण्याची शक्यता आहे.

Chinchwad : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करत संजोग वाघेरे यांची प्रचाराला सुरुवात

देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे दिल्लीत असल्याने लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीत सामील करुन घेण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो. यावेळी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्यासमोर काय प्रस्ताव ठेवणार हे पाहावे लागेल. आतापर्यंत भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.  या भेटीगाठींपलीकडे दोन्ही पक्षांमधील युतीच्यादृष्टीने काही ठोस घडले नव्हते. लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने भाजप-मनसे युती प्रत्यक्षात होऊ शकते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.