Today’s Horoscope 19 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 19 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 19.03.2024.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेला असेल.

आज नक्षत्र – पुनर्वसु 20.10  पर्यंत नंतर पुष्य.

चंद्र राशी – मिथुन 17.37 पर्यंत नंतर कर्क.

—————————–

मेष- ( शुभ रंग- पांढरा)

कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आज जरा आईच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी.

वृषभ – (शुभ रंग- पिस्ता)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही तुम्ही आपलेसे कराल.

मिथुन- (शुभ रंग – क्रीम)

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्त्वाच्या चर्चेत मात्र इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या.

कर्क- ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांचे मूड सांभाळावे लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.

सिंह – ( शुभ रंग- राखाडी)

आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल.

कन्या-  (शुभ रंग- चंदेरी)

नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होईल.

तूळ – (शुभ रंग- आकाशी)

नवीन व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली करा. आत्मविश्वासाचा अतिरेकही नुकसानाला कारणीभूत होईल. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडून देऊ नये.

वृश्चिक- ( शुभ रंग- जांभळा)

कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस तितकासा अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागेल.

धनु- (शुभरंग- मरून)

आज तुमचा कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदाराशी आज चांगले सूर जुळतील.

मकर- (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमची तब्येत थोडीशी नरमच राहील. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. येणी असतील तर अनपेक्षित पणे वसूल होतील. प्रवासात मात्र सावध रहा.

कुंभ-  ( शुभरंग- गुलाबी)

व्यापार उद्योगाला चांगली गती येईल. स्थावरची खरेदी विक्री फायद्यात राहील. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल असेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल.

मीन- (शुभ रंग- भगवा)

कौटुंबिक सदस्यांमध्ये असलेला सुसंवाद हा तुमचा घराबाहेर कामातील उत्साह वाढवेल. आज गृहिणींना माहेरची ओढ लागेल. कला क्रीडा क्षेत्रात मेहनत वाढवावी लागणार आहे.

     

   शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.